शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

वाशिम जिल्ह्यात गारपिटीने ४ ८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 12:03 PM

Crops on 4880 hectares damaged by hail in Washim district जिल्ह्यातील ६ हजार ६९७ शेतकºयांना मोठा फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १९ मार्च रोजी रात्री वादळीवाºयासह गारपिट झाली. या नैसर्गिक संकटामुळे ४ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, मूग, ज्वारी, कांदा, पपई आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. यात जिल्ह्यातील ६ हजार ६९७ शेतकºयांना मोठा फटका बसला असून महसूल व कृषी विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.१९ मार्च रोजी ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबत जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांकडून प्राप्त माहितीवरून एकत्रित प्राथमिक अहवाल तयार करून तो विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील वाशिम, कोंडाळा झामरे, नागठाणा, पार्डी आसरा, पार्डी टकमोर, अनसिंग या महसूल मंडळात १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. या मंडळांतर्गत येणाºया गावांमधील २१२३ शेतकरी यामुळे बाधीत झाले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा, मुंगळा, करंजी, चांडस व शिरपूर महसूली मंडळात ११३२ हेक्टरवरील गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला, टरबूज, शेवगा, पपई व सोयाबीन या पिकांना जबर फटका बसला. यामुळे १८०० शेतकºयांचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील केनवड व गोवर्धन महसूली मंडळात १४७६ हेक्टरवरील कांदा, पपई, उन्हाळी मूग आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन १८९३ शेतकरी बाधीत झाले. मंगरूळपीर तालुक्यात आसेगाव महसूली मंडळात ४६ हेक्टरवरील गहू, हरभरा, रबी ज्वारी, मूग, कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन ९६ शेतकºयांचे नुकसान झाले; तर मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, कुपटा, शेंदुरजना, गिरोली व उमरी बु. महसूली मंडळात ५३१ हेक्टरवरील हरभरा, ज्वारी, गहू आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून ८६५ शेतकºयांना फटका बसल्याचे प्रशासनाने प्राथमिक अहवालामध्ये नमूद केले आहे. 

टॅग्स :washimवाशिमHailstormगारपीटagricultureशेतीFarmerशेतकरी