पिकांत डवरणी, खुरपणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST2021-06-28T04:27:50+5:302021-06-28T04:27:50+5:30
^^^^^^^ शाळांच्या निर्जंतुकीकरणाची तयारी वाशिम : सोमवारपासून शिक्षकांसाठी शाळा उघडणार आहेत. त्यामुळे जि. प. शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून, ...

पिकांत डवरणी, खुरपणीला प्रारंभ
^^^^^^^
शाळांच्या निर्जंतुकीकरणाची तयारी
वाशिम : सोमवारपासून शिक्षकांसाठी शाळा उघडणार आहेत. त्यामुळे जि. प. शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून, शिक्षण विभाग व ग्रामपंचायतींनी याची तयारी केली आहे. वर्गखोल्या, ओसरी, कार्यालय आणि परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
----------
इंझोरीमध्ये सहा हजार हेक्टर पेरणी
वाशिम : मृग नक्षत्रातील पावसाच्या भरवशावर इंझोरी सर्कलमधील शेतकऱ्यांनी वेगाने खरीप पेरणी केली. त्यामुळे २७ जूनपर्यंत इंझोरी सर्कलमध्ये सहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असून, हे प्रमाण नियोजित क्षेत्राच्या ९० टक्के आहे.
============
जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या नादुरुस्त
वाशिम मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ६० वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरुस्ती करून संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी २७ जूनला केली.
--------------------
शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा कायम
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी संपत आली तरी किन्हीराजासह परिसरातील एक हजारावर शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळाले नाही. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी होत आहे.