विमा कंपनीकडून पीक नुकसानाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:27 IST2018-08-29T14:23:21+5:302018-08-29T14:27:05+5:30
नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, या अंतर्गत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलेल्या शेतकºयांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली.

विमा कंपनीकडून पीक नुकसानाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी: या महिन्याच्या मध्यंतरी आलेल्या जोरदार पावसामुळे इंझोरी परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी पिकविमा उतरविला आहे, अशा शेतकºयांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, या अंतर्गत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलेल्या शेतकºयांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत बुधवार २९ आॅगस्ट रोजी इंझोरीतील काही शेतकºयांच्या शेताला भेटी देऊन पाहणी करण्यात आली. अनेक शेतकºयांनी मात्र, अद्यापही याबाबत तक्रारच केली नसल्याचे कळले आहे.
इंझोरी परिसरात आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी मुसळधार पाऊस पडला. यात १६ आॅगस्ट रोजी आलेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांची जमीन खरडून गेली, पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानाची पाहणी आमदार राजेंद्र पाटणी, तसेच कृषी आणि महसूल विभागाकडून करण्यात आली. दरम्यान, ज्या शेतकºयांनी पिकविमा उतरविला आहे. अशा शेतकºयांच्या शेताची पाहणी करूनच पिकविमा कंपनीकडून मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी ज्या शेतकºयांनी पिकविमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली, अशाच शेतकºयांच्या शेताची पाहणी करण्यात येत आहे. या अंतर्गत इंझोरी येथे बुधवार २९ आॅगस्ट रोजी हरीदास ढोरे, प्यारेलाल राठोड, गोवर्धन राठोड यांच्यासह काही शेतकºयांच्या शेताला पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी विश्वनाथ काळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकºयांकडून आवश्यक ती माहिती घेत नुकसानाची छायाचित्रेही काढली.