शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पीक नुकसानाचे पंचनामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 12:01 IST

Crop damage panchnama in Washim district Incomplete : १० दिवस उलटून गेले तरी, या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झाले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यान वादळी वारा, अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने रबी पिकांसह, भाजीपाला आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाने ६८८० हेक्टर क्षेत्राला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला; परंतु १० दिवस उलटून गेले तरी, या नुकसानीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला. लाखो हेक्टर क्षेत्रातील रबी पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यात वाशिम जिल्ह्यात २७ महसूल मंडळातील १६९ गावांतील गहू, हरभरा या रबी पिकांसह भाजीपाला पिके, तसेच टरबूज, खरबूज, पपई, संत्रा, लिंबू आदी फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला असून, तसा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला आहे. तथापि, १० दिवस उलटले तरी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर अंतिम अहवालच सादर करण्यात आला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.   ३० टक्के पंचनामे प्रलंबित जिल्ह्यात ६८८० हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, भाजीपाला पिके आणि फळपिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे; परंतु ३० मार्चपर्यंतही यापैकी केवळ ७० टक्के क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून, उर्वरित ३० टक्के क्षेत्रातील पंचनामेच झाले नसल्याने तालुकास्तरावरून अंतिम अहवालच प्राप्त होऊ शकला नाही.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी