विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: August 25, 2014 01:55 IST2014-08-25T01:45:22+5:302014-08-25T01:55:45+5:30

अनसिंग येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतिसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Crime against the three victims of marriage | विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

अनसिंग : येथील एका १९ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या पतिसह सासरच्या तीन जणांविरुद्ध विविध कलमांखाली अनसिंग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राणी राहुल पवार असे मृतक महिलेचे नाव आहे. ती अनसिंग येथीलच रहिवासी असून, तिचा मृतदेह रविवार २४ ऑगस्ट रोजी गावालगतच्या एका विहिरीत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपली मुलगी मृतक राणी पवारच्या मृत्यू हा तिच्या पतिसह सासरच्यांनी केलेल्या छळामुळे झाला. त्यांनीच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद मृतक राणी पवारचे वडील बबन इंगळे रा. दिग्रस यांनी अनसिंग पोलिसात दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून मृतक राणी पवारचा पती राहुल पवार, मनोहर पवार, सुरेखा पवार या तिघांविरुद्ध कलम ४९८ अ, ३0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वृत्त लिहेस्तोवर कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुभाष वंजारे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: Crime against the three victims of marriage