मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:49 IST2021-03-01T04:49:21+5:302021-03-01T04:49:21+5:30

मानोरा : तालुक्यातील चौसाळा येथील ट्रॅक्टर चालकाला मजुरीचे पैसे मागितल्याने तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी ...

Crime against three in assault case | मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा

मानोरा : तालुक्यातील चौसाळा येथील ट्रॅक्टर चालकाला मजुरीचे पैसे मागितल्याने तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नीळकंठ रामप्रसाद टिके (रा. चौसाळा) यांनी याविषयीची फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गावातील राहुल रमेश आडे यांच्या ट्रॅक्टरवर गेल्या ४० दिवसांपासून कामावर होते. त्यांना मजुरीचे ५ हजार रुपये दिल्यानंतर त्यांनी उर्वरित पैशांची मागणी केली असता, राहुल रमेश आडे यांनी ते देण्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी शेतात गेले असता, आरोपी राहुल रमेश आडे, रमेश हरू आडे, हरू भावसिंग आडे यांनी त्यांचा ट्रॅक्टर सोडून इतरांकडे का गेला, अशी विचारणा करून फिर्यादीला काठीने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. नीळकंठ यांच्यावर मानोरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना वाशिम येथे पाठविण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी आरोपी राहुल रमेश आडे, रमेश हरू आडे, हरू भावसिंग आडे यांच्यावर कलम ३२४, ५०४, ५०६, ३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against three in assault case