म्हशीला विषारी औषध देऊन मारल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 16:01 IST2020-11-01T16:01:00+5:302020-11-01T16:01:13+5:30
Washim Crime news विषारी औषध देऊन म्हशीला मारल्याचा पशूपालक दिनकर पंढरी यांचा आरोप आहे.

म्हशीला विषारी औषध देऊन मारल्याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन शिरपूर अंतर्गत एकांबा येथे म्हशीच्या मृत्यूप्रकरणी पशूपालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १२ जणांंवर गुन्हा दाखल केला. विषारी औषध देऊन आरोपींनी म्हशीला मारल्याचा पशूपालक दिनकर पंढरी यांचा आरोप आहे.
एकांबा येथील दिनकर पंढरी गवळी यांच्याकडे तीन म्हशी होत्या. ते यातील दोन म्हशी घरात, तर एक म्हैस घराबाहेर बांधून ठेवत होते. रविवार १ नोव्हेंबर रोजी तिन्ही म्हशी सकाळी सात वाजेपर्यंत तंदुरुस्त होत्या. दिनकर गवळी हे ८.३० वाजता म्हशी चराईला सोडण्यास जात असताना एका म्हशीच्या तोंडाला फेस आल्याचे दिसले. त्यांनी गावातील पशू डॉक्टरांना उपचारासाठी बोलावले; परंतु तू येईपर्यंत म्हशीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रमेश रंगराव गवळी, सुधीर रमेश गवळी, आकाश रमेश गवळी, संतोष माणिक गवळी, ज्ञानेश्वर दामोदर गवळी, विठ्ठल दामोदर गवळी, बबन नारायण गवळी, देवराव नारायण गवळी, गोपाल बबन गवळी, शंकर बबन गवळी व दोन महिलांसह एकूण १२ जणांवर कलम ४२९ ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हशी बांधण्यावरून झाला होता वाद
दिनकर गवळी यांनी या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा काही शेजाºयांशी १७ आॅक्टोबरला म्हशी बांधण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी शेजाºयांनी एखाद्या दिवशी म्हशी मारुन टाकू अशी धमकी त्यांना दिली होती. त्यामुळे आपली म्हैस शेजारच्या लोकांनीच विषारी औषध देऊन मारली असून, यात त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.