प्रजासत्ताकदिनी रंगला वकील संघाचा क्रिकेट सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:03+5:302021-02-05T09:23:03+5:30
या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन ॲड. शंकर मगर यांनी केले. मालेगाव येथे आयोजित क्रिकेट सामन्यात वाशिम कर्मचारी, वाशिम ...

प्रजासत्ताकदिनी रंगला वकील संघाचा क्रिकेट सामना
या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन ॲड. शंकर मगर यांनी केले.
मालेगाव येथे आयोजित क्रिकेट सामन्यात वाशिम कर्मचारी, वाशिम वकील संघ, मालेगाव न्यायालयीन व वकील संघ यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये वाशिम कर्मचारी संघ व मालेगाव संघ यांच्यात अंतिम सामना झाला. दोन्ही संघांची धावसंख्या समान राहिल्याने सुपर ओव्हरचा आधार घेण्यात आला. त्यात मालेगाव संघाने विजय खेचून आणत पहिले पारितोषिक पटकाविले, तर वाशिम संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यामध्ये मालेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश शिरसाट, ॲड. सचिव संतोष बोरचाटे, ॲड. सहसचिव बाबुराव तायडे, ॲड. प्रदीप सहस्रबुद्धे, ॲड. विजय बळी, ॲड. अमोल तायडे, ॲड. महेश शेलकर, ॲड. ज्ञानेश्वर कऱ्हाळे, ॲड. सय्यद इम्रान, ॲड. विवेकानंद सहस्रबुद्धे यांनी क्रिकेट सामन्याचे आयोजन केले.