शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विम्याच्या तक्रारीसाठी यंत्रणा निर्माण करा ! - आमदार पाटणी यांची मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:26 IST

विम्याच्या तक्रारीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (वाशिम):  मागील वर्षी खरीप हंगामात वाशिम जिल्ह्यात दोन पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीन व तुर पिकाचे नुकसान झाले. मात्र सरासरीच्या तुलनेत पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकरी विम्यापासुन वंचित राहिले. यासाठी विम्याचा जोखीमस्तर ७० टक्क्यांवर वरून ८५ ते ९० टक्के करावा तसेच विम्याच्या तक्रारीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. बेस्ट आॅफ फाईव्हच्या पध्दतीने विम्याचे रेट काढले जातात. ५ वर्षामध्ये सरासरी ५० क्विंटलचे उत्पन्न असेल तर दरवर्षी १० क्विंटल उत्पन्न गृहित धरून सरासरी काढल्या जाते. जोखिम स्तराच्या ७० टक्के उत्पादन विमा कंपनीने गृहित धरलेले आहे. त्यामुळे शेतकºयांना ७० टक्क््यांच्या खाली उत्पन्न आले तर विम्याचे पैसे मिळतात. ७१ टक्के उत्पन्न आले तरी ते पैसे मिळत नाही या धोरणात बदल करण्यासाठी ७० टक्यांची ही मर्यादा ८५ ते ९० टक्के करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्र्यांकडे आमदार पाटणी यांनी मागणी केली आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे मांडावा, अशी विनंतीही पाटणी यांनी केली. विम्याच्या तक्रारीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर विमा कंपनीचे संबंधित अधिकारी उपस्थिती राहतील, अशी यंत्रणा निमार्ण करण्याची मागणीही त्यांनी केली.  नुकसानभरपाई मिळावीसरासरी कमी पाऊस पडला विंष्ठवा दुष्काळ जाहीर झाला तरच विमा कंपन्या भरपाई देतात. पण दोन पावसामध्ये जर खूप खंड पडला तर ते गृहित धरत नाही. मागच्यावर्षी जिल्ह्यात सरासरी पाऊस पडला, परंतु तिथे दोन पावसामध्ये खूप खंड पडला. त्यामुळे पिकांचे ५० टक्के नुकसान झाले. तरीही त्यांना मदत मिळाली नाही. ज्या ठिकाणी दोन पावसामध्ये खंड पडल्यामुळे पिकांचे नुकसान झाले त्यांना सुध्दा विम्याच्या नुकसानाचे पैसे मिळाले पाहिजे, अशी मागणी आमदार पाटणी यांनी रेटुन धरली.  सिंचन अनुशेष दूर करावाराज्याचे सरासरी हंगामी सिंचनावरील उत्पन्न म्हणजे रब्बीचे पिक ५६ टक्क््यांच्यावर गेलेले आहे. पण अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आजही २८ ते ३० टक्यांच्यावर हंगामी सिंचनाची स्थिती गेलेली नाही. या चार जिल्ह्यातील शेतकºयांचे सिंचन राज्याच्या सरासरीच्या तुलनेत आणण्यासाठी ९५ टक्के ठिंबक व स्प्रिंकलरला सबसीडी द्यावी, अशी मागणीही आमदार पाटणी यांनी केली.

टॅग्स :Rajendra Patniराजेंद्र पाटणीwashimवाशिमKaranjaकारंजा