CoronaVirus in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ७६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 11:46 IST2020-09-04T11:45:38+5:302020-09-04T11:46:07+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद ३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली.

CoronaVirus in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ७६ पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद ३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. दुसरीकडे दिवसभरात ७६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांची संख्या १९३८ वर पोहोचली आहे. दरम्यान गुरूवारी ५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात मेडशी येथे पहिला कोरोनाबाधीत रुग्ण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळला होता. जून महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै व आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. सप्टेंबर महिन्यातही रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच वाढला असून, गुरूवारी यामध्ये आणखी ७६ रुग्णांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील पुसद नाका परिसर १, राजनी चौक परिसर ३, देवपेठ येथील १, चांडक ले-आऊट परिसर २, दंडे चौक परिसर ११, लाखाळा परिसर १, विठ्ठलवाडी परिसर २, दत्तनगर परिसर २, चामुंडादेवी परिसर १, नंदीपेठ परिसर १, घोटा येथील ३, सुपखेला येथील १, भटउमरा येथील १, इलखी येथील १, मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, मंगलधाम परिसर १, आसेगाव येथील १, सनगाव येथील १, चोरद येथील १, शेलूबाजार येथील ४, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १, एरंडा येथील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर परिसर ३, महानंदा नगर परिसर १, देशमुख गल्ली येथील १, राधाकृष्ण नगर येथील १, लोणी फाटा येथील १, आसेगाव पेन येथील २, किनखेडा येथील २०, रिठद येथील ३, कारंजा लाड शहरातील १, लाडेगाव येथील १ अशा ७६ जणांचा समावेश आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९३८ झाली असून, यापैकी १४१६ जणांनी कोरोनावर मात केली. आता ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाशिम, जवळा येथील रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात हळूहळू वाढ होत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. वाशिम शहरातील दंडे चौक येथील ५२ वर्षीय व्यक्ती व जवळा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान २ सप्टेंबरला मृत्यू झाला. आता एकूण मृत्यूसंख्या ३५ झाली असून, एका जणाने आत्महत्या केली.
५६ जणांना डिस्चार्ज
गुरूवारी जिल्ह्यातील ५६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील १६, अनसिंग येथील २, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसर २, सुभाष चौक परिसर २, नागी येथील १, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील २, कोयाळी येथील २, सवड येथील ३ जणांनी गुरूवारी कोरोनावर मात केली.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन १, मैराळडोह १, दुधाळा ३, कारंजा लाड शहरातील मानक नगर परिसर १, संतोषी माता कॉलनी परिसर १, महावीर कॉलनी परिसर १, मोठे राम मंदिर परिसर १, सिंधी कॅम्प परिसर १, नागनाथ मंदिर परिसर १, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर १, बालाजी नगर १, पोहा १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.