CoronaVirus in Washim : प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:43 IST2020-06-22T11:43:25+5:302020-06-22T11:43:36+5:30
जिल्हा प्रशासनाने आता प्रतिबंधित क्षेत्राबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांचीही आरोग्य सुरू केली.

CoronaVirus in Washim : प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही होणार तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता प्रतिबंधित क्षेत्राबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांचीही आरोग्य सुरू केली. घरोघरी केल्या जाणाऱ्या सर्वेतून अतिजोखमीचे नागरिक, गरोदर महिला, लहान बालकांचा शोध घेतला जाणार असून, त्यानुसार त्यांच्या तातडीने वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध व अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागात नगरपालिका व आरोग्य विभागाच्या पथकाकडून घरोघरी जाऊन २१ जूनपासून आरोग्य तपासणी मोहिम सुरू केली. या पथकाला आपल्या आरोग्याविषयी तसेच अतिजोखमीच्या आजाराबद्दल अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. कोरोना विषाणू संसर्गाचे लवकरात लवकर निदान होऊन योग्य उपचार झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. कोरोना विषाणू संसर्गाची ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे ही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच शरीरातील आॅक्सिजन पातळीही कमी होते. अशी लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी होऊन लवकरात लवकर निदान व्हावे, योग्य उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभाग व नगरपालिका पथकामार्फत शहरी भागात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. या तपासणीमध्ये ताप तसेच पल्स आॅक्सीमीटरद्वारे शरीरातील आॅक्सिजनची पातळी तपासली जात आहे. आपल्या घरी येणाºया आरोग्य पथकाकडून कुटुंबातील सर्व व्यक्तींची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
अतिजोखमीच्या आजाराची अचूक माहिती द्या !
मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, क्षयरोग यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग अधिक घातक असल्याचे दिसून येते. अशा व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने त्यांची माहिती सुद्धा आरोग्य तपासणी दरम्यान घेतली जात आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबात असे आजार असलेल्या व्यक्तींची अचूक माहिती आरोग्य कर्मचा?्यांना द्यावी. तसेच ६० वर्षांवरील व्यक्ती, गरोदर महिला यांचीही माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले आहे.