CoronaVirus in Washim : जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; २१ कोरोना पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:01 IST2020-10-09T13:00:53+5:302020-10-09T13:01:01+5:30
CoronaVirus in Washim : जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू

CoronaVirus in Washim : जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; २१ कोरोना पॉझिटिव्ह !
वाशिम : जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद ८ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली तर दुसरीकडे दिवसभरात २१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता कोरोनाबाधितांची संख्या ४८६८ वर पोहोचली आहे.
आॅक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळत आहे. गुरूवारी दिवसभरात २१ जण पॉझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, सुपखेला येथील १, काटा येथील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील १, मंगरूळपीर शहरातील १, मोहरी येथील ३, कारंजा लाड शहरातील वाणीपुरा येथील १, शासकीय निवासस्थान परिसरातील २, माजीदपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गुरुकृपा मेडिकल परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, गायत्री नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, महागाव येथील १, पिंप्री मोडक येथील १ अशा २१ जणांचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४८६८ वर पोहोचली असून, त्यातील ९८ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ४०६७ लोक बरे झाले.
(प्रतिनिधी)