CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; १८ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 15:49 IST2020-11-24T15:49:14+5:302020-11-24T15:49:37+5:30
Washim coronavirus news २३ नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर १८ जण पाॅझिटिव्ह आले.

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू; १८ पाॅझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात तब्बल २२ दिवसानंतर कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. सोमवारी दिवसभरात १८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. आता एकूण कोरोनाबाधितांचा संख्या ५९६७ वर पोहचली आहे. दरम्यान सोमवारी ७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
२२ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू नव्हता. २३ नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर १८ जण पाॅझिटिव्ह आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील बोराळा येथील १, रिसोड शहरातील ३, येवती येथील १, देऊळगाव बंडा येथील २, मानोरा शहरातील १, भुली येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, डही येथील १, शिरपूर येथील १, वसारी येथील १, मारसूळ येथील १, किन्हीराजा येथील १, कारंजा लाड शहरातील साळीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणच्या २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. सोमवारी सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आता जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५९६७ वर पोहचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १४५ जणांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)