शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात आणखी तीन पॉझिटिव्ह; रुग्ण ११६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:36 AM

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११६ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शुक्रवार ३ जुलै रोजी आज सकाळी २२ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर ०३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात खडकी (ता. मालेगाव) येथील ३२ वर्षीय व्यक्ती, वाशिम शहरातील शासकीय निवासस्थान परिसरातील ६५ वर्षीय महिला व मोठा गवळीपुरा परिसरातील ४५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी तिघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११६ झाली आहे. त्यात जिल्ह्यातील ११२, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १२ जणांचा समावेश आहे. त्यापैकी एकाचा वाशिम जिल्ह्यात, तर दोघांचा परजिल्ह्यात मृत्यू झाला आहे. शिवाय ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यात जिल्ह्यात उपचार घेणाºया ७८, तर परजिल्ह्यात उपचार घेणाºया २ जणांचा समावेश आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात २५ आणि बाहेरच्या जिल्ह्यात ८ रुग्ण मिळून वाशिम जिल्ह्यातील एकूण ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवार ३ जुलै रोजी तिघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यात तामसी येथील ०२ व रिसोड येथील ०१ अशा तीन व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ८० वर पोहोचली असून, जिल्ह्यात कोरोनामूक्त होणाºया रूग्णांचे प्रमाणही वाढतच असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने वाशिम व कारंजा शहरातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी व शरीरातील आॅक्सिजन पातळी तपासणी मोहिम २१ जूनपासून सुरू केलेली आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जावून घरात असलेल्या संपूर्ण कुटुंबाची नोंद करुन तपासणी केल्या जात असून नागरिकांचे टेम्परेझर, प्लस यासह आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. शरीराचे तापमान जास्त आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधल्या जात आहे. या मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतिने करण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील नागरिकांची तपासणी वेगातकारंजा तालुक्यात गेल्या महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढू लागताच प्रशासन आणि आरोग्य विभागाने शहरास तालुक्यातील ग्रामीण भागांत नागरिकांची तपासणी सुरू केली. यासाठी तालुका आरोग्य अधिकाºयांच्या मार्गदर्शनात डॉक्टरांचा समावेश असलेल्या पथकांची नियुक्ती करण्यात आली. या पथकांनी शहरातील कन्टेनमेंट झोनसह इतर भागातील नागरिकांची तपासणी केली, तर ग्रामीण भागातही गावागावात फिरून आरोग्य विभागाने तपासणी केली. या संपूर्ण तपासणीदरम्यान कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती वगळता कोणातही कोरोना संसर्गाची लक्षणे आजवर आढळून आलेली नाहीत.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या