शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

CoronaVirus : कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणाही आता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:24 AM

वातानुकूलित किंवा थंड वातावरण या विषाणूच्या संसर्गासाठी पोषक ठरते.

- दादाराव गायकवाड  वाशिम: खोकला आणि शिंकण्यातून हवेत पसरणारा कोरोना विषाणू वातानुकूलित वातावरणात जास्त काळ जिवंत राहतो. त्यामुळे ससंर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती असते. त्यामुळे राज्यभरातील प्रशासकीय कार्यालयात वातानकूलित यंत्रणा, कूलरचा वापर न करण्याचे अथवा गरजेपुरता कमीतकमी करण्याचे आदेश जारी करण्याच्या सुचना राज्याच्या प्रधान सचिवांनी १८ मार्च रोजी अपर सचिव, प्रधान सचिव आणि सर्व मंत्रालयीन सचिवांना दिल्या आहेत. या आदेशाची प्रत विभाग आणि जिल्हास्तरावरील प्रत्येक विभागप्रमुखांना देण्यात आली आहे.कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून आरोग्यविषयक खबरदारी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने श्वसन संस्थेच विकार असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे, शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे, हात वारंवार धुणे, अर्धवट शिजलेले कच्चे मांस न खाणे, फळे, भाज्या स्वच्छ धुवून खाणे आदिंचा समावेश आहे; परंतु या विषाणूपासून होणारा आजार व त्याचा प्रसार मुख्यत्वे बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून व शिंकण्यातून जे थेंब बाहेर पडतात. त्यातूनच मोठ्या प्रमाणात होत आहे. या आजारात संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. कोरोना विषाणूचा अंतर्भाव असलेले शिंकण्यातून आणि खोकल्यातून हवेत उडणारे थेंब हवेतील धुलीकणांसोबत विविध वस्तूंच्या थेंबातील विषाणू जास्त काळ जिवंत राहतात. अर्थात वातानुकूलित किंवा थंड वातावरण या विषाणूच्या संसर्गासाठी पोषक ठरते. या उलट योग्य वायूविजन (व्हेंटिलेशन) किं वा तापमान जास्त असलेल्या वातावरणात शिंकण्या, खोकण्यातून बाहेर पडणारे थेंब लवकर सुकतात त्यामुळे विषाणूचा जीवन कालावधी कमी होऊन रोग प्रसारणास प्रतिबंध होतो. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणेचा किंवा कूलरचा वापर टाळणे किंवा आवश्यकतेपुरताच कमीतकमी करणे, तसेच दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवून जास्तीतजास्त वायूविजन होऊ देणे हा या विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपाय ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊनच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा न वापरणे किंवा या यंत्रणेचा गरजेपुरता कमीतकमी वापर करण्याबाबत सुचना निर्गमित करण्याचे आदेश राज्याच्या प्रधान सचिवांनी १८ मार्च रोजी अपर सचिव, प्रधान सचिव आणि सर्व मंत्रालयीन सचिवांना दिल्या आहेत. या आदेशाची प्रत सर्व विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्यसेवा आयुक्त, आरोग्य संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालक आदिंना पाठविण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwashimवाशिम