मंगरूळपीर पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव; विभाग केले कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST2021-03-20T04:41:36+5:302021-03-20T04:41:36+5:30
मंगरूळपीर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचे युध्दपातळीवर प्रयत्नही सुरू आहेत. चाचण्यांवर भर देण्यात ...

मंगरूळपीर पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव; विभाग केले कुलूपबंद
मंगरूळपीर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचे युध्दपातळीवर प्रयत्नही सुरू आहेत. चाचण्यांवर भर देण्यात येत असल्याने बाधितांच्या संख्येतही वाढ हाेत आहे. या अहवालामध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णही आढळत आहे. ७५ खेडी जोडलेल्या पंचायत समितीमध्ये दररोज शेकडो लोक कामानिमित्त येत असतात. वाशिम जि.प. मध्ये काही कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांमधील सर्व अधिकारी, कर्मचार्यांना कोरोना तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यातच शिक्षण विभागातील चार अधिकारी, कर्मचार्यांसह इतर विभागातही तीन कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पं.स.चा शिक्षण विभाग कुलूपबंंद करण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे मात्र इतर सर्व विभाग सुरू आहेत. काही पाॅझिटिव्ह रूग्ण कोविड सेंटरवर किंवा गृह अलगीकरणात न राहता इतरत्र फिरत असल्याने घबराट पसरली आहे. प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.