कोरोना योद्ध्याच्या पत्नीला ५० लाखांचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST2021-02-05T09:29:42+5:302021-02-05T09:29:42+5:30
वाशिम : कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेले ग्रामसेवक अशोक साठे यांच्या पत्नी शुभांगी साठे यांना पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या ...

कोरोना योद्ध्याच्या पत्नीला ५० लाखांचा धनादेश
वाशिम : कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेले ग्रामसेवक अशोक साठे यांच्या पत्नी शुभांगी साठे यांना पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी ५० लाखांचा धनादेश वाशिम येथे देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत कारखेडा (ता. मानोरा) येथे कर्तव्य बजावताना कोरोना संसर्गामुळे ग्रामसेवक अशोक साठे यांचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगाने साठे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करुन साठे यांच्या वारसदार पत्नीला न्याय मिळवून दिला. जिल्हा नियोजन भवनमधील कार्यक्रमात पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते साठे यांच्या पत्नी शुभांगी साठे यांना हा ५० लाखांचा धनादेश देण्यात आला.