कोरोना लसीकरण प्रक्रिया थंड बस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:49 IST2021-09-14T04:49:05+5:302021-09-14T04:49:05+5:30
................. नादुरुस्त रस्त्याचे नूतनीकरण सुरू वाशिम : पोस्ट ऑफिस चाैक ते पुसद नाक्यादरम्यान महामार्गावरून जुनी आययूडीपी काॅलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची ...

कोरोना लसीकरण प्रक्रिया थंड बस्त्यात
.................
नादुरुस्त रस्त्याचे नूतनीकरण सुरू
वाशिम : पोस्ट ऑफिस चाैक ते पुसद नाक्यादरम्यान महामार्गावरून जुनी आययूडीपी काॅलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली होती. या नादुरुस्त रस्त्याच्या नूतनीकरणास काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून सध्या हे काम प्रगतिपथावर असल्याचे दिसत आहे.
..........
ऑनलाईन शिक्षणात इंटरनेटचा खोडा
वाशिम : तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही मोबाईलला पुरेशा गतीने इंटरनेट मिळत नाही. यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया अडचणीत सापडली असून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा सूर सर्वच स्तरांतून उमटत आहे.
........................
माकडांचा उच्छाद, नागरिक हैराण
वाशिम : शहरातील शुक्रवार पेठ परिसरात दैनंदिन सकाळच्या सुमारास माकडे उच्छाद मांडत आहेत. टिनपत्र्यांची घरे असलेल्या नागरिकांना त्याचा अधिक त्रास होत असून घराच्या छतावरील पाण्याच्या टाक्यांवरील प्लास्टिक पाईपची मोडतोड माकडांकडून करणे सुरू आहे. वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शुभम सूर्यवंशी यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली.
..............
ढगाळी वातावरणाने किडींचा प्रादुर्भाव
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस होण्यासह ढगाळी वातावरण कायम राहत आहे. यामुळे खरिपातील पिके धोक्यात सापडली असून, विशेषत: सोयाबीनवर काही ठिकाणी विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. परिस्थिती वेळीच नियंत्रणात न आल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशी शक्यता शेतकरी राजेश कडू यांनी वर्तविली.
....................
कचरा टाकला जातोय उघड्यावर
वाशिम : शहरातील पाटणी चाैकालगत भाजीबाजार भरतो. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर शिल्लक राहणारा भाजीपाला तसाच उघड्यावर टाकला जात असून मोकाट कुत्रे व वराहांचा संचार वाढण्यासह डासांचा प्रादुर्भाव होत आहे. न.प.ने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गणेश काळे यांनी केली.
.........
समृद्ध गाव स्पर्धा प्रशिक्षणास प्रतिसाद
वाशिम : जिल्ह्यातील मंगरूळपीर आणि कारंजा या दोन तालुक्यांमधील ५३ गावांचा समृद्ध गाव स्पर्धेत समावेश करण्यात आलेला आहे. या गावांमध्ये विविध स्वरूपातील कामे केली जात असून ग्रामस्थांना त्याविषयीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी दिली.
...............