शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कोरोना लसीकरण:  वाशिम जिल्ह्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 11:53 IST

CoronaVaccination लस घेण्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर असून, नगर परिषद व नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी द्वितीय स्थानी आहेत. 

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, दुस-या टप्प्यात गत १३ दिवसांपासून अन्य शासकीय विभागांतील अधिकारी, कर्मचा-यांना लस दिली जात आहे. लस घेण्यात पोलीस कर्मचारी आघाडीवर असून, नगर परिषद व नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी द्वितीय स्थानी आहेत. देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणा-या कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस दुस-या टप्प्यात जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. दुस-या टप्प्यात पोलीस, महसूल, नगर परिषद व नगर पंचायतीच्या अधिकारी, कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. पोलीस विभागातील २१२७, नगर परिषद व नगर पंचायत विभागातील ६३६, महसूल विभागातील ९१० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आहे. 

आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. या अधिकारी, कर्मचा-यांना १४ फेब्रुवारीपासून कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

जि.प. अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणीजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येणार असून, सध्या नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ८६० जणांची नोंदणी झाली आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर या अधिकारी, कर्मचा-यांचे पुढील आठवड्यापासून लसीकरण सुरू होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

दुस-या टप्प्यात महसूल, पोलीस, नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचा-यांची नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे ११ हजार डोस उपलब्ध झाले असून १४, १५ फेब्रुवारीपासून आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक वाशिम

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिस