मंगरुळपीर तालुक्यात कोरोना रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST2021-03-20T04:41:41+5:302021-03-20T04:41:41+5:30
मंगरुळपीर : तालुक्यासह शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिक मात्र नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. येथील कोविड सेंटर ...

मंगरुळपीर तालुक्यात कोरोना रुग्ण वाढले
मंगरुळपीर : तालुक्यासह शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिक मात्र नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. येथील कोविड सेंटर रुग्णांनी भरले असल्याने आता दुसऱ्या इमारतीत कोरोना बाधित रुग्ण दाखल करणे सुरू आहे. कोविड सेंटरला आज रोजी ८९ रुग्ण कोरोना बाधित असून दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे.
नागरिकांनी गर्दी टाळून मास्कचा वापर करावा तसेच आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले असले तरी ठिकठिकाणी लोक गर्दी करीत आहेत. तर अनेकजण मास्कचा वापरसुद्धा करीत नाहीत. गतवर्षीपासून तालुक्यात २५ हजार नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १८१६ जण कोरोना बाधित आढळले तर २१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी दिली.