शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक;  ३१८ पाॅझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:46 IST

CoronaVirus News प्रथमच एका दिवसात ३१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, प्रथमच एका दिवसात ३१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २४ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला तसेच उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. दरम्यान, ३० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी कोरोनाचा उद्रेक झाला असून, कोरोनाबाधितांच्या संख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ३१८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील १९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंदही बुधवारी घेण्यात आली. ३१८ पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील २, छत्रपती शिवाजी नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ३, देवपेठ येथील ३, आययुडीपी येथील ४, काटीवेस येथील १, लाखाळा येथील १, माधवनगर येथील १, नंदीपेठ येथील १, नवीन आययुडीपी येथील १, शुक्रवार पेठ येथील २, टिळक चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अडोळी येथील १, अनसिंग येथील २, गुंज येथील १, जुमडा येथील १, केकतउमरा येथील १, कोंडाळा येथील ४, मालेगाव शहरातील २, जऊळका येथील १, बोरगाव येथील १, गिव्हा कुटे येथील १, शेलू फाटा येथील १, मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील १, पाळोदी येथील १, पोहरादेवी येथील १, साखरडोह येथील १, वाईगौळ येथील १, कारंजा शहरातील अकोला अर्बन बँक परिसरातील ३, भगतसिंग चौक परिसरातील १, भारतीपुरा येथील ३, दत्त कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, जागृतीनगर येथील १, बाबारे कॉलनी येथील १, गणपती नगर येथील २, जिरापुरे कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील १, सुंदरवाटिका येथील २, माळी कॉलनी येथील १, निवारा कॉलनी येथील २, प्रगतीनगर येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, गवळीपुरा येथील १, वनदेवी नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, भामदेवी येथील १, दापुरा येथील १, धनज येथील ७, हिवरा लाहे येथील १, कामरगाव येथील ४, कसगाव येथील १, पारवा कोहर येथील १, पिंपळगाव येथील १, आखतवाडा पीएनसी कॅम्प येथील २, रहाटी येथील १, शहा येथील १, सिरसोळी येथील १, वाई येथील १, धामणी खडी येथील १, जांब येथील १, पोहा येथील १, यावर्डी येथील १, रिसोड शहरातील १, दापुरी येथील १, मसलापेन येथील १, मोठेगाव येथील १  आदींचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा ८,२४० वर पोहोचला आहे.

८९० जणांवर उपचार  जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,२४० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ७,१९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला असून सद्य:स्थितीत ८९० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या