Corona Cases in Washim : आणखी तीन कोरोनामुक्त; तीन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 17:46 IST2021-08-22T17:46:02+5:302021-08-22T17:46:09+5:30
Corona Cases in Washim: २२ आॅगस्ट रोजी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर तीन जणांनी कोरोनावर मात केली.

Corona Cases in Washim : आणखी तीन कोरोनामुक्त; तीन पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून रविवार, २२ आॅगस्ट रोजी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१७०० वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले आहे. रविवारी तीन जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. मालेगाव तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत पाचही तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१७०० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१०४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६३७ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
१५ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने ३ रुग्ण आढळून आले तर तीन जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या गृहविलगीकरणात असे एकूण १५ रुग्ण आहेत.