Corona Cases in Washim :  पाच जणांचा मृत्यू; नव्याने आढळले ४८६ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:13 PM2021-05-17T12:13:27+5:302021-05-17T12:13:50+5:30

Corona Cases in Washim: पाच जणांचा मृत्यू झाला; तर आज नव्याने ४८६ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Corona Cases in Washim: Five killed; 486 newly found infected | Corona Cases in Washim :  पाच जणांचा मृत्यू; नव्याने आढळले ४८६ बाधित

Corona Cases in Washim :  पाच जणांचा मृत्यू; नव्याने आढळले ४८६ बाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरोग्य विभागाकडून रविवारी प्राप्त अहवालानुसार कोरोना विषाणू संसर्गाने बाधित पाच जणांचा मृत्यू झाला; तर आज नव्याने ४८६ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, ९ मे पासून जिल्हाभरात कडक निर्बंध लागू असतानाही कोरोना बाधितांचा व मृतकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा ३५ हजार ७४९ वर पोहोचला असून ३० हजार ८९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला; तर सध्या ४ हजार ४८५ जण उपचारार्थ शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. कोरोनाने आतापर्यंत ३७१ जणांना जीव गमवावा लागला आहे. 
दरम्यान, आज आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार नव्याने बाधित रुग्णांमध्ये वाशिम तालुक्यात ८०, मालेगाव तालुक्यात ९५, रिसोड तालुक्यात ९७, मंगरूळपीर तालुक्यात ४६, कारंजा तालुक्यात १३३ आणि मानोरा तालुक्यात ११ यासह जिल्ह्याबाहेरील २३ रुग्णांचा समावेश आहे. प्रकृती सुधारल्यामुळे ५९७ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
(प्रतिनिधी)

Web Title: Corona Cases in Washim: Five killed; 486 newly found infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app