लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवारी, ९ मे रोजी आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४६९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३२,०७५ वर पोहोचला आहे.
वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढत आहे. रविवारीदेखील वाशिम तालुक्यात १४२ जण कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली. एकूण ४६९ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १४२, मालेगाव तालुक्यातील ८०, रिसोड तालुक्यातील ७३, मंगरुळपीर तालुक्यातील ८२, कारंजा तालुक्यातील ३६ आणि मानोरा तालुक्यात १८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३८ बाधितांची नोंद झाली असून, ४४८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी कडक निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ४६९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:25 IST
Corona Cases in Washim : दोघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४६९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू; ४६९ पॉझिटिव्ह
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}