Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू ; नव्याने २७५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 18:38 IST2021-05-19T18:38:11+5:302021-05-19T18:38:23+5:30
Corona Cases in Washim: बुधवार, १९ मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या सर्वात कमी आढळून आली आहे.

Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू ; नव्याने २७५ बाधित
वाशिम : गत एका महिन्यानंतर पहिल्यांदाच बुधवार, १९ मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या सर्वात कमी आढळून आली आहे. बुधवारी नव्याने २७५ रुग्ण आढळले तर ४७२ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, १९ मे रोजी आणखी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. गत तीन दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाºयांची संख्या अधिक असल्याचे आढळून येत आहे. गत एका महिन्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या निचांकीवर आली आहे. वाशिम तालुक्यात तर केवळ ६३ रुग्ण आढळून आले आहेत. वाशिम शहरातील बाजारपेठेतील गर्दी ओसरल्याचे चांगले परिणाम यानिमित्ताने समोर येत असल्याचे बोलले जात आहे. बुधवारच्या अहवालानुसार रिसोड तालुक्यात सर्वाधिक ७५ रुग्ण आढळून आले आहेत तर सर्वात कमी रुग्ण मानोरा तालुक्यात ८ आढळून आले. दुसºया लाटेत आतापर्यंत सरासरी ४५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. बुधवारी कमी संख्येत रुग्ण आढळून आल्याने आणि त्या तुलनेत दीड पटीने रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासियांना किंचितचा दिलासा मिळत आहे. दरम्यान, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंदही बुधवारी घेण्यात आली. जिल्ह्याबाहेरील २९ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३६८७१
४१६९ सक्रिय रुग्ण
ूबुधवारच्या अहवालानुसार नव्याने २७५ रुग्ण आढळून आले तर ४७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४१६९ रुग्ण सक्रिय आहेत.