Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४९१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:29 IST2021-05-08T18:29:35+5:302021-05-08T18:29:43+5:30
Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू तर ४९१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ मे रोजी पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ४९१ पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी एकाचा मृत्यू तर ४९१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ८ मे रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३१६०५ वर पोहोचला आहे.
वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासियांची चिंता वाढत आहे. शनिवारीदेखील वाशिम तालुक्यात १२३ जण कोरोनाबाधित आढळून आले. आणखी एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी घेण्यात आली. एकूण ४९१ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १२३, मालेगाव तालुक्यातील ५३, रिसोड तालुक्यातील ५४, मंगरूळपीर तालुक्यातील ७२, कारंजा तालुक्यातील ६८ आणि मानोरा तालुक्यात ८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ३४ बाधितांची नोंद झाली असून ५२४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
पोहरादेवीत पुन्हा कोरोना रुग्ण वाढले
मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे दोन महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. आता पुन्हा शनिवारी पोहरादेवी येथे २१ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, गावात तळ ठोकून आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध नागरिकांची चाचणी केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथेदेखील १८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे शनिवारी निष्पन्न झाले.