Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ११४ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:11 IST2021-05-31T18:11:35+5:302021-05-31T18:11:42+5:30
Corona Cases in Washim: सोमवार ३१ मे रोजी आणखी एका जणाचा मृत्यूची नोंद झाली, तर २७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim : आणखी एकाचा मृत्यू; ११४ कोरोना पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून, सोमवार ३१ मे रोजी आणखी एका जणाचा मृत्यूची नोंद झाली, तर २७२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४००६३ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. सोमवारी नव्याने ११४ रुग्ण आढळून आले तर २७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंदही सोमवारी घेण्यात आली. जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ५७८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
२१५८ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने ११४ रुग्ण आढळून आले तर २७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण २१५८ रुग्ण सक्रिय आहेत.
१२० मृत्यूची पोर्टलवर नोंद
शहरासह जिल्ह्यातील खासगी कोविड हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची नोंद पोर्टलवर होण्यास विलंब होत होता. आरोग्य विभागाने २४ मे रोजी स्पष्ट केल्यानुसार जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेल्या काही दिवसांत झालेल्या मृत्यूंची माहिती पोर्टलवर अपडेट करण्याची कार्यवाही सुरु होती. त्यानुसार पोर्टलवर अपडेट झालेल्या १२० मृत्यूंची नोंद सोमवारी घेण्यात आली.