Corona Cases in Washim : २७ जणांची कोरोनावर मात; १६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:45 IST2021-06-26T18:45:04+5:302021-06-26T18:45:10+5:30
Corona Cases in Washim: शनिवार, २६ जून रोजी २७ जणांनी कोरोनावर मात केली तर १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim : २७ जणांची कोरोनावर मात; १६ पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून शनिवार, २६ जून रोजी २७ जणांनी कोरोनावर मात केली तर १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,३६० वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. शनिवारी नव्याने १६ रुग्ण आढळून आले तर २७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम तालुक्यात २, रिसोड तालुक्यात ४, मालेगाव तालुक्यात २, मंगरूळपीर तालुक्यात २, कारंजा तालुक्यात ६ असे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ४१,३६० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०४७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत ६१७ जणांचे मृत्यू झाले. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी धोका संपूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
२७१ सक्रिय रुग्ण
शनिवारच्या अहवालानुसार नव्याने १६ रुग्ण आढळून आले तर २७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण २७१ रुग्ण सक्रिय आहेत.
मानोरा तालुका निरंक
शनिवारच्या अहवालानुसार मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. वाशिम शहरात १ तर ग्रामीण भागात १, रिसोड शहरात २ तर ग्रामीण भागात २, मालेगावच्या ग्रामीण भागात २, मंगरूळपीर शहरात १ तर ग्रामीण भागात १ आणि कारंजा शहरात १ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले.