Corona Cases in Washim : आणखी १४ जणांचा मृत्यू; ३१२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:11 IST2021-05-22T19:11:31+5:302021-05-22T19:11:50+5:30
Corona Cases in Washim : २२ मे रोजी आणखी १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३१२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

Corona Cases in Washim : आणखी १४ जणांचा मृत्यू; ३१२ पॉझिटिव्ह
वाशिम : जिल्ह्यात मृत्यूसत्र कायम असून शनिवार, २२ मे रोजी आणखी १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ३१२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३७९७१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. मृत्यूसत्रही कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वाशिम शहरासह तालुक्यातही रुग्णसंख्या आढळून येत असल्याने अधिक सतर्क राहणे आवश्यक ठरत आहे. शनिवारच्या अहवालानुसार वाशिम तालुक्यात ८३ तर सर्वात कमी रुग्ण मानोरा तालुक्यात ३१ आढळून आले. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाºयांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. शनिवारी नव्याने ३१२ रुग्ण आढळून आले तर ५८८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील १५ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा आलेख खाली येत असला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कुणीही गाफील राहू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
३७५६ सक्रिय रुग्ण
ूशनिवारच्या अहवालानुसार नव्याने ३१२ रुग्ण आढळून आले तर ५८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३७५६ रुग्ण सक्रिय आहेत.