Corona Case in Washim : आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 18:37 IST2021-07-19T18:37:41+5:302021-07-19T18:37:47+5:30
Corona Case in Washim : १९ जुलै रोजी ३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर १० जणांनी कोरोनावर मात केली.

Corona Case in Washim : आणखी ११ कोरोनामुक्त; ४ पॉझिटिव्ह!
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून सोमवार, १९ जुलै रोजी ३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर १० जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१,६१२ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी नव्याने ४ रुग्ण आढळून आले तर ११ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मालेगाव व मानोरा तालु्क्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१६१६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात मृत्यूसत्राला ब्रेक मिळाल्याचे दिसून येते. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.