मेडशीत सुरू होणार कोरोना केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST2021-04-28T04:44:25+5:302021-04-28T04:44:25+5:30

मेडशी येथे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याकरिता येथील जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी प्रदीप तायडे, सरपंच शेख जमीर शेख गणीभाई, ...

Corona Care Center to start in Medshit | मेडशीत सुरू होणार कोरोना केअर सेंटर

मेडशीत सुरू होणार कोरोना केअर सेंटर

मेडशी येथे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याकरिता येथील जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी प्रदीप तायडे, सरपंच शेख जमीर शेख गणीभाई, उपसरपंच सोनाली धीरज मंत्री, पंचायत समिती सदस्य कौशल्‍याबाई रामभाऊ साठे यांनी आमदार झनक यांच्याकडे पाठपुरावा केला. मेडशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सध्या दोन इमारती आहेत. नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र आणि जुनी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या सुसज्ज असून या इमारतींमध्ये कोरोना रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणत्या जागेची निवड केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मुलचंद चव्हाण, जगदीश राठोड, ज्ञानेश्वर मुंडे, धीरज मंत्री, प्रशांत मेडशीकर, अमोल तायडे, उमेश तायडे, संजय भागवत, प्रसाद पाठक, विठ्ठल भागवत आदींची उपस्थिती होती.

Web Title: Corona Care Center to start in Medshit