जिल्हा विकासासाठी सहकार्य करा

By Admin | Updated: August 17, 2014 01:25 IST2014-08-17T01:22:59+5:302014-08-17T01:25:55+5:30

वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मनोहर नाईक यांचे प्रतिपादन.

Cooperate for district development | जिल्हा विकासासाठी सहकार्य करा

जिल्हा विकासासाठी सहकार्य करा

वाशिम : जिल्हय़ाच्या निर्मितीला नुकतीच सोळा वष्रे पूर्ण झाली आहेत. जिल्हय़ाच्या सर्वांंगीण विकासासाठी व शासकीय योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक गरजू घटकांपर्यंंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत. विकासाच्या बाबतीत जिल्हय़ाला राज्यात अग्रेसर करण्यासाठी सर्वांंंनी हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे अन्न व औषधे प्रशासनमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री ना. मनोहर नाईक यांनी केले.
देशाच्या स्वातंत्रदिनाच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात मनोहरराव नाईक यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोनाली जोगदंड, जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते.
यावेळी अहिल्याबाई होळकर पुरस्कार २0११-१२ यासाठी नंदाबाई गणोदे रा. अमनवाडी, ता. मालेगाव व सन २0१२-१३ साठी बायडाबाई कांबळे रा. मांगवाडी, ता. रिसोड यांना पुरस्कार मंजूर झाल्याचे नाईक यांनी जाहीर केले.
यावेळी जिल्हय़ातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा, उद्योजकांचा व विद्यार्थ्यांंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्वातंत्र सैनिक खेडकर, माजी सैनिक, जिल्हा सत्र व न्यायाधीश शिकची, लोकप्रतिनिधी, पत्रकार व विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शिरसाट व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी केले.

Web Title: Cooperate for district development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.