त्या वादग्रस्त ग्रामसेवकाची अखेर बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:15+5:302021-07-31T04:41:15+5:30
रिसाेड : तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतचे सचिव अनंता साहेबराव गायकी यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी मंगरुळपीर तालुक्यात ...

त्या वादग्रस्त ग्रामसेवकाची अखेर बदली
रिसाेड : तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतचे सचिव अनंता साहेबराव गायकी यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी मंगरुळपीर तालुक्यात नांदगाव येथे केली आहे. सचिव गायकी यांनी रिसोड तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्य फंड, चौदावा वित्त आयोग,शौचालयाच्या फंडामध्ये लाखो रुपयांचा गैरप्रकार केला होता. यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे.
तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत गैरप्रकाराची तक्रार उपसरपंच भारत चव्हाण यांनी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हाधिकारी,आयुक्त अमरावती यांच्यापर्यंत केली होती. तक्रारीत उपसरपंच चव्हाण यांनी सचिव गायकी यांनी केलेल्या आर्थिक गैरप्रकाराचा पाढाच वाचला होता. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांनी सचिव अनंता गायकी यांची रिसोड तालुक्यातून मंगरूळपीर पंचायत समिती अंतर्गत नांदगाव येथे बदली केली आहे. बदली करण्यात आलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले की गायकी यांना तत्काळ कार्यमुक्त करावे तसेच कार्यमुक्त केल्यानंतर पूर्वीच्या आस्थापना वरून यापुढे त्यांचे कोणत्याही प्रकारचे देयक काढू नये सदर आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मांडवा येथील ग्रामसेवकाची बदली झाल्यानंतर गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
(प्रतिनिधी)