नगर परिषद सेवानिवृत्त कर्मचा-यांचे उपोषण सुरू
By Admin | Updated: February 27, 2015 00:52 IST2015-02-27T00:52:53+5:302015-02-27T00:52:53+5:30
मंगरूळपीर येथील सेवानवृत्त कर्मचारी पंधरा वर्षापासून देय रक्कमेपासून वंचित.

नगर परिषद सेवानिवृत्त कर्मचा-यांचे उपोषण सुरू
मंगरूळपीर (जि. वाशिम) : येथील नगर परिषद सेवानवृत्त कर्मचार्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे आदेशानूसार विविध प्रकारच्या थकीतेय रक्कमा देणे बंधनकारक आहेत. मात्र, थकित रक्कम मिळाली नसल्याच्या निषेधार्थ सेवानवृत्त कर्मचार्यांनी २३ फेब्रुवारीपासून न.प. कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
ज्या कर्मचार्यांनी आपले जिवन पणाला लावून येथील स्थानिक स्वराज्य संस्था (नगर परिषद) विकसीत होण्याकरीता रात्रंदिवस सेवा दिली मात्र त्यांचेवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. शासनाचे दुर्लक्ष आणि नगर परिषदेमधील गलथान कारभार याला जबाबदार असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. सेवानवृत्त संघटनेद्वारे थकीत देय रक्कमा मिळण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी सुचना,निवेदन दिले आहेत. तथा संघटने द्वारे स्वताच्या न्याय हक्कांच्या मागणी संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे २ जुलै २00३ रोजी याचीका दाखल करून नागपूर खंडपीठाचे निकाल तथा नगर प्रशासन /कावी-८/ महागाई भत्ता २00४/0५/५0७ दि. ५ जूलै २00४ नुसार चे परीपत्रकानूसार थकीत रक्कम देण्याचे आदेश असतांना नगर परिषदेने अंशत: अमलबजावणी केली पंरतू आज पंधरा वर्षसंपून ही लाखो रूपये थकबाकी देय रक्कमा दिलेल्या नाहीत, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. न्यायोचित मागणीसाठी सेवानवृत्त कर्मचार्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर २३ फेब्रुवारी २0१५ पासून धरणे तथा उपोषणास सुरूवात केली आहे.