शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दवाखाने सुरु ठेवा, अन्यथा कठोर भूमिका घेवू - जिल्हाधिकारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 5:19 PM

खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावे अन्यथा जिल्हा प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर भूमिका घ्यावी लागेल.

वाशिम : जिल्ह्यातील खासगी दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने नियमितपणे सुरु ठेवावे अन्यथा जिल्हा प्रशासनाला नाईलाजास्तव कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमए व निमा संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत दिला.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, आयएमएचे (इंडीयन मेडीकल असोसिएशन) अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे, सचिव डॉ. अमित गंडागुळे, निमाचे सचिव डॉ. राजेश चौधरी यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय व गैरसमज होत आहे. किरकोळ आजार, दुखण्यावर सुध्दा त्यांना उपचार घेण्यासाठी प्रवास करून शासकीय रुग्णालयात यावे लागत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवरील ताण वाढला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाचा  प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण शासकीय आरोग्य यंत्रणा काम करीत असताना जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरु ठेवावेत. दवाखाने सुरु ठेवण्यासाठी काही अडचणी येत असतील तर जिल्हा प्रशासन त्यामध्ये समन्वय साधून मार्ग काढेल, असे जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले. खासगी दवाखान्यात तसेच औषधी दुकानात काम करणारा कर्मचारी वर्ग, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील आरोग्य मित्र यांनी सुध्दा नियमितपणे कामावर हजर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  मोडक यांनी दिल्या. आदेशाचे पालन न करणाºयांविरूद्ध होणार कारवाई !कोरोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याने राज्यात साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाºयांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या आजारावर उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने सुरु ठेवावेत. तसेच औषधी विक्री केंद्र, प्रयोगशाळा (लॅब) सुध्दा सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी दिला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपेपर्यंत हा आदेश लागू राहणार असून खासगी दवाखाने, औषधी विक्री केंद्र, प्रयोगशाळा (लॅब) यामधील सर्व मदतनीस, नर्स, रिसेप्शनिस्ट यांच्यासह इतर कर्मचाºयांना सुद्धा हे आदेश लागू राहणार आहेत. या आदेशाचे पालन न करणाºया व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ चे कलम २ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय