ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मंच वाशिम, मंगरूळपीर व कारंजात करणार जनजागृती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:23 PM2018-03-12T17:23:53+5:302018-03-12T17:23:53+5:30

वाशिम : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने मंगळवार १३ मार्च रोजी वाशिम, मंगरूळपीर व कारंजा (लाड) येथील प्रमुख चौकात पथनाट्याव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

Consumer Forum to creat Public awareness on consumer day | ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मंच वाशिम, मंगरूळपीर व कारंजात करणार जनजागृती  

ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मंच वाशिम, मंगरूळपीर व कारंजात करणार जनजागृती  

Next
ठळक मुद्देवाशिम, मंगरूळपीर व कारंजा (लाड) येथील प्रमुख चौकात पथनाट्याव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. धम्मपाल पडघान, पोतराज दौलत पडघान आणि झांजवादक प्रकाश शृंगारे आपल्या शाहीराच्या कलेतुन ग्राहकांची जनजागृती करणार

 

वाशिम : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने मंगळवार १३ मार्च रोजी वाशिम, मंगरूळपीर व कारंजा (लाड) येथील प्रमुख चौकात पथनाट्याव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती व्हावी, ग्राहकांची फसवणूक होवू नये आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कायार्ची सर्व ग्राहकांना माहिती मिळावी या हेतूने अ. भा. ग्राहक पंचायत वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवार १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता कारंजा (लाड), दुपारी १२.३० वाजता मंगरूळपीर आणि दुपारी ३.३० वाजता वाशिम शहरातील प्रमुख चौकामध्ये पुरूषोत्तमबाबा निर्मल कलासंच, वाशीमचे प्रमुख शाहीर तथा माजी जिल्हा परिषद सदस्य के. के. डाखोरे व संच ग्राहकांची पथनाट्याव्दारे जनजागृती करणार आहेत. शाहीर के. के. डाखोरे यांचे सोबत शाहीर प्रज्ञानंद भगत, शाहीर सुरेश शृंगारे, ढोलकी वादक सुरेश भगत, स्त्रीच्या भूमिकेत धम्मपाल पडघान, पोतराज दौलत पडघान आणि झांजवादक प्रकाश शृंगारे आपल्या शाहीराच्या कलेतुन ग्राहकांची जनजागृती करणार असल्याची माहिती अ. भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रांजल जैन, संघटन मंत्री अभय खेडकर यांनी दिली.

Web Title: Consumer Forum to creat Public awareness on consumer day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.