बांधकाम साहित्य महागले; घरकुलांचे स्वप्न आवाक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST2021-05-16T04:39:40+5:302021-05-16T04:39:40+5:30
गत महिनाभरात बांधकाम साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ५० किलो सिमेंटच्या पोत्यामागे ३० ते ५० ...

बांधकाम साहित्य महागले; घरकुलांचे स्वप्न आवाक्याबाहेर
गत महिनाभरात बांधकाम साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ५० किलो सिमेंटच्या पोत्यामागे ३० ते ५० रुपयांची वाढ होऊन सध्या ३९० ते ४३० रुपयांवर पोहोचले आहे. स्टील (गज) किलोमागे ८ ते ९ रुपयांनी वाढून ६५ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. लोखंडी पाइपचा दर एका महिन्यापूर्वी ५६ रुपये होता. त्यात १४ रुपये वाढ होऊन ७० रुपये प्रतिकिलो या दराने विकले जात आहे. ६ ब्रासच्या रेतीचे दर पाच हजारांनी वाढून सध्या सुमारे ३० हजार रुपये झाले आहेत. खडी आणि विटांचे दर मात्र स्थिर असल्याचे दिसून येत आहे.
......................
बांधकाम खर्च वाढला; नागरिक हैराण
काही बांधकाम व्यावसायिकांशी याबाबत चर्चा केली असता, साधारणत: एक हजार चौरस फूट बांधकाम करण्यासाठी सिमेंटचे ६०० पोते, ४ हजार किलो लोखंड, ४० ते ५० ब्रास रेती, २० ते ३० ब्रास खडी व ३० ते ४० हजार विटा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या सर्वच साहित्यांचे दर वधारल्याने बांधकाम खर्चदेखील वाढला आहे.