शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कॉग्रेस, राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज!

By admin | Updated: October 22, 2014 00:28 IST

वाशिम जिल्ह्यात सत्तेची फळे चाखणा-या कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदारांनी नाकारले.

वाशिम : गत १५ वर्षापासून जिल्ह्यात सत्तेची फळे चाखणार्‍या कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदारांनी सपसेल नाकारले. या दोन्ही पक्षांच्या काही उमेदवारांना तर चक्क अनामत रक्कमही वाचविता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक या पक्षांचा पराभव हा मतदारांनी अथवा विरोधकांनी नव्हे तर स्वकियांनीच केला असे म्हटल्यास अतिश्योक्ती ठरणार नाही. या निवडणूकीला अस्तित्वाची लढाई म्हणून शिवसेना, भाजप व मनसेवाले लढत असताना, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसमधील काहींनी स्वत:च्या उमेदवारांच्या विरोधातच शड्ड ठोकले. परिणामी, मतदार गोंधळला. यातूनच या दोन्ही पक्षाला मानहानी जनक पराभवाला समोरा जावे लागले.शिवसेना व भाजपच्या युतीचा घटस्फोट तथा कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीतील बिघाडीमुळे यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. कॉग्रेस व राष्ट्रवादीचा अपवाद वगळता इतर सर्वच पक्षांनी या निवडणूकीत स्वत:ची प्रतिष्ठा झोकली होती. मात्र कॉग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आपसातील वैर काढण्यातच मश्गुल दिसले. स्वबळावर लढणार्‍या दोन्ही कॉग्रेसला जिल्ह्यात अस्तित्व दाखविण्यासाठी या निवडणूकीच्या माध्यमातून चांगली संधी चालून आली होती. राज्यात भाजपची लाट असली तरी, जिल्ह्यातील परिस्थिती या उलट होती. वाशिम मतदारसंघातील विद्यमान आमदारांवर मतदार नाराज होते. कारंजा मतदारसंघातील भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाचे उमेदवार पार्सल होते. त्यामुळे कॉग्रेसने या मुद्द्यांना कॅश केले असते, परिस्थिती बदलण्याची शक्यताही नाकारता आली नसती, मात्र, कॉग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी विरोधकांपेक्षा स्वत:चीच जीरवण्यावर भर दिला.