आश्वासनाने उपाेषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:17+5:302021-02-05T09:23:17+5:30

माहिती न दिल्याने नगर पंचायत कार्यालयासमोर २६ जानेवारीला ७ वाजता त्यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे होते. नगरपंचायत ...

Concluding the sermon with reassurance | आश्वासनाने उपाेषणाची सांगता

आश्वासनाने उपाेषणाची सांगता

माहिती न दिल्याने नगर पंचायत कार्यालयासमोर २६ जानेवारीला ७ वाजता त्यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे होते. नगरपंचायत कार्यालयाकडे सुनील शर्मा यांनी ११ जानेवारी २०२१ला दिलेल्या पत्रात मौजे कुरळा धरणावरून मालेगाव शहराला पुरवठा होणाऱ्या नळयोजनेचे पाणी हे पिण्याचे आहे किंवा वापरण्याचे आहे, त्याचबरोबर नगरपंचायतर्फे वसूल केला जाणारा टॅक्स किती व कशा स्वरूपात वसूल केला जातो याची माहितीही लेखी स्वरूपात तातडीने देण्यात यावी, अशी मागणी केली हाेती; परंतु नगर पंचायततर्फे याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याने २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी सकाळी ७ वाजेपासून आमरण उपोषणाला बसले होते. नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्याबरोबरच जिल्हाधिकारी, तहसीलदार तथा पोलीस निरीक्षक मालेगाव यांना पत्राच्या प्रती देण्यात आल्या हाेत्या . अखेर डॉ. विवेक माने, बबनराव चोपडे, संतोष तिखे, गजानन सारस्कर आदींनी मध्यस्थी करून ही बाब तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब नगरपंचायतच्या मासिक सभेत ठेवून यावर निर्णय घेता येईल, या आश्वासनानंतर उपाेषणाची सांगता करण्यात आली.

Web Title: Concluding the sermon with reassurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.