धम्म परिषदेचा समारोप
By Admin | Updated: May 12, 2014 23:20 IST2014-05-12T23:14:50+5:302014-05-12T23:20:21+5:30
दहा दिवसीय श्रामनेर भिक्षू संघ व महिला धम्म संस्कार शिबिराचा समारोपही करण्यात आला.

धम्म परिषदेचा समारोप
कारंजालाड : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने १0 मे रोजी तालुक्यातील इंझा येथे एकदिवसीय धम्म परिषद पार पडली. यादिवशी दहा दिवसीय श्रामनेर भिक्षू संघ व महिला धम्म संस्कार शिबिराचा समारोपही करण्यात आला. परिषदेचे उद्घाटन वसंत पराड यांनी केले. या प्रसंगी उस्मानाबाद येथील राजेंद्र निकाळजे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत, केंद्रीय शिक्षक आर.आर.कसबे मुंबई, केंद्रिय शिक्षिका सुनंदाताई पवर यांनी धम्म परिषदेच्या परिसंवादात सहभाग घेतला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी शाखाध्यक्ष संतोष भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विनोद सुरवाडे, प्रा.प्रकाश जंजाळ, प्रा.युवराज पहाडे, बा.पु.इंगोले, संध्या पंडित, अभिमन्यू पंडित, अश्विन खिल्लारे, राजाभाऊ चव्हाण, प्रकाश राऊत, गुणवंत चक्रे, देविदास गजभिये, मेघा राऊत, शीला राऊत, गीता वानखडे, इंदिरा बागडे, सुमेध चक्रनारायण, बाळू रामटेके, मंदा गवई, संध्या खडसे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नरेंद्र लांजेवार यांनी केले. शिबिरात भंते डी.धम्मानंद (परभणी), आर.आर.कसबे (मुंबई) यांनी शिबिरातील १५ श्रामनेर व ५४ महिलांना संस्काराचे धडे दिले. सूत्रसंचालन राजेंद्र रंगारी तर आभार लक्ष्मणराव मोटघरे यांनी मानले. परिषदेच्या यशस्वतेसाठी भीम प्रेरणा मित्र मंडळ व महिला मंडळी तसेच अनिता कांबळे, गणेश बागडे, दिपंकर पाटील, सूर्यकांत सूर्यवंशी, बाबाराव पाटील, मनोहर पाटील यांनी सहकार्य केले.