शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

संस्कारित भावी पिढी निर्माण करण्याचा संकल्प- शांतीलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 4:35 PM

शांतीलाल मुथा हे वाशिममध्ये आले असता, त्यांच्याशी साधलेला संवाद...

शिखरचंद बागरेचा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्टÑ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या राज्यभरात मूल्यवर्धन मेळावे घेतले जात आहेत. वाशिममध्येही २५ ते २७ फेब्रूवारीला हा मेळावा पार पडला. यानिमित्त शांतीलाल मुथा हे वाशिममध्ये आले असता, त्यांच्याशी साधलेला संवाद...

‘मूल्यवर्धन’संबंधी काय सांगाल?मूल्यवर्धन हा उपक्रम भारतीय राज्यघटना, शिक्षण हक्क कायदा २००९, राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० यावर आधारित आहे. शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत, समग्र शाळा दृष्टीकोन (होल स्कूल अ‍ॅपरोच), सर्वसाधारण व्यवहार, दैनंदिन कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी शाळांच्या गरजा, प्राधान्यक्रम, उपलब्ध असणाºया साधनसामग्रीनुसार आवश्यक बदल करून हा उपक्रम राबविता येतो.

मूल्यवर्धनातून नेमके काय निष्पन्न होणार?मूल्यवर्धन उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वत:ची प्रगती साधण्याची जाणीव निर्माण होते. स्वतंत्र, चिकित्सक आणि जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते. स्वत:शी तसेच इतरांशी संबंधित समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय ते शोधू शकतात. परस्परांमधील संबंध आदरयुक्त रितीने जोपासण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण होईल. कुटूंब, शाळा आणि स्थानिक समुदायाच्या भल्यासाठी ते कृतीशिल योगदान देऊ शकतील.

शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित सहकार्य मिळतेय का?मागील १० वर्षातील मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, प्रधानसचिव, शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक, एससीईआरटीचे संचालक, अधिकारी वर्ग, शिक्षणाधिकारी, डायट अधिकारी, जिल्हा व तालुका पातळीवरील मूल्यवर्धन नोडल आॅफीसर, विस्तार अधिकारी  तसेच राज्यातील सर्व जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक आदींचा मूल्यवर्धन उपक्रमात सक्रीय सहभाग व अपेक्षित सहकार्य मिळत आहे.

उपक्रमातून कुठले उद्देश साध्य करण्याचे ध्येय आहे?सुरक्षित, भयमुक्त, सर्वसमावेशक शालेय वातावरण निर्माण करणे, बालकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे, बालस्नेही वातावरण असणारे, मुल्याधारित  क्षमता विकसीत करणाºया पद्धतींचा अवलंब करणारे वर्ग विकसीत करणे, आदी उद्देश समोर ठेवण्यात आले. बालस्नेही व विद्यार्थी केंद्रीत पद्धतीने आनंददायी वातावरणात  विविध कृती, वर्ग उपक्रम आणि शालेय उपक्रम याव्दारे विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देणे ही मुल्यवर्धन कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे.

टॅग्स :Shantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशनwashimवाशिमinterviewमुलाखत