संगणक परिचालकांच्या दिवाळीवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:34 IST2018-10-23T18:33:32+5:302018-10-23T18:34:03+5:30
वाशिम: गेल्या वर्षभरापासून मंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगणक परिचालकांचे मानधनच मिळाले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संगणक परिचालकांच्या दिवाळीवर संक्रांत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गेल्या वर्षभरापासून मंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगणक परिचालकांचे मानधनच मिळाले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र आणि राज्य सरकार कोणतेही काम करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा आधार घेत आहे. शेतकºयांच्या विविध कामांसह सर्व प्रकारचे आॅनलाईन काम या संगणक परिचालकांकडून करण्यात येते. मात्र या कामगारांनाच वर्षभरापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जून २०१७ ते सप्टेंबर २०१८ पासून ५५ पैकी एकाही संगणक परिचालकाला सेवेचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करीत असून, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांचे मानधन प्रलंबित असल्याने त्यांची दिवाळीही अंधारातच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 'आपले सरकार'च्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना आॅनलाईन सेवा देणाºया मंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगणक परिचालकांपैकी काही जणांचे मानधन सहा महिन्यांपासून, तर काहींचे वर्षभरापासून प्रलंबित आहे.
आवास योजनेच्या सर्वेचे मानधनही प्रलंबित
शासनाच्यावतीन प्रधानमंत्री आवास योजनेंंतर्गत पंचायत समित्यांमार्फत सर्वेक्षणासाठी याद्या तयार करण्यात आल्या. या याद्यानुसार घरोघरी सर्वे करून त्याची नोंद प्रधानमंत्री आवास योजनेच्या अॅपवर करण्याचे कामही संगणक परिचालकांच्यावतीने करण्यात आले. या अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील १० हजारांच्यावर नोंदी संगणक परिचालकांनी केल्या. या नोंदीसाठी प्रत्येकी २० रुपये प्रमाणे मोबदला म्हणून ठरलेले मानधनही अद्याप संगणक परिचालकांना मिळालेले नाही.
गटविकास अधिकाºयांना निवेदन
मंगरुळपीर तालुक्यातील ५५ संगण परिचालकांचे मानधन जून २०१७ पासून रखडल्याने या संगणक परिचालकांवर आर्थिक संकटच कोसळले आहे. त्यांनी याबाबत मंगरुळपीरच्या गटविकास अधिकाºयांकडे निवेदन सादर करून मानधन अदा करण्याची मागणी केली आहे.