वाशिम जिल्ह्यातील ५१ पैकी ३८ विंधन विहिरींची कामे पूर्ण
By Admin | Updated: March 10, 2015 01:50 IST2015-03-10T01:50:35+5:302015-03-10T01:50:35+5:30
रिसोड तालुक्यात सर्वाधिक विहिरींचा समावेश.

वाशिम जिल्ह्यातील ५१ पैकी ३८ विंधन विहिरींची कामे पूर्ण
नंदकिशोर नारे / वाशिम: पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार राबविल्या जाणार्या उपाय योजनेंतर्गत जिल्हय़ातील ५१ प्रशासकीय मान्यताप्राप्त नवीन विंधन विहिरींपैकी ३८ विहिरींची कामे ९ मार्चपर्यंंत पूर्ण झाली आहेत. जिल्हय़ात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी मंजुरी दिली होती. या आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजनांवर ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे ठरले होते. यामध्ये नवीन विंधन विहिरीसाठी ७९ गावे प्रस्तावित करण्यात आली होती. प्रस्तावित सर्व नवीन विंधन विहिरीकरिता सर्वेक्षण झाले असून, भूजल सर्वेक्षणानुसार योग्य असलेल्या ५१ नवीन विंधन विहिरींना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती त्यामधील ३८ विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित १३ विहिरींची कामे येत्या ८ दिवसात पूर्ण होणार आहेत. तसेच ६ गावांकरिता ८ खासगी विहीर अधिग्रहणाव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्हय़ातील सहाही तालुक्यांमध्ये नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण झाली, त्यामध्ये मंगरूळपीर तालु क्यातील ९, मालेगाव ७, रिसोड ११, मानोरा ६, कारंजा २ व वाशिम तालुक्यातील ३ गावांतील विहिरींचा समावेश आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता उपकार्यकारी अभियंता एन.एम. राठोड यांनी पाणी टंचाईसदृश परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर ५१ पैकी ३८ विहिरींचे खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरि त विहिरींची कामे येत्या ८ दिवसात पूर्ण होणार असल्याचे सांगीतले.