रस्त्याचे काम निकृष्ट हाेत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST2021-08-19T04:44:52+5:302021-08-19T04:44:52+5:30

तक्रारीत नागरिकांनी म्हटले मकी, मालेगाव येथील वाॅर्ड क्र .१४ मधील रस्त्याचे काम खासदारांच्या निधी अंतर्गत सुरू आहे. या रस्त्याचे ...

Complaint that the road work is in poor condition | रस्त्याचे काम निकृष्ट हाेत असल्याची तक्रार

रस्त्याचे काम निकृष्ट हाेत असल्याची तक्रार

तक्रारीत नागरिकांनी म्हटले मकी, मालेगाव येथील वाॅर्ड क्र .१४ मधील रस्त्याचे काम खासदारांच्या निधी अंतर्गत सुरू आहे. या रस्त्याचे काम व्यवस्थित हाेत नसल्याने नागरिकांनी विचारणा केली असता बांधकाम विभागात जाऊन विचारणा करण्याचा सल्ला देण्यात आला. रस्त्याचे काम नियमानुसार हाेत नसून वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणीही तक्रारीतून करण्यात आली आहे. तसेच हे काम थांबविण्यात यावे व इस्टिमेटप्रमाणे करावयास सांगावे अन्यथा या रस्त्याचे काम करू नये अशी मागणी केली आहे. तक्रारीवर योगेश मुंढरे, डाॅ. गणेश मुंढरे, गणेश कुटे, संतोष कुटे, विष्णू कुटे, राजू निजोते, अमन मालवी, विक्रम मुंढरे, अखिल भाई, अभिजित मुंढरे, सुनील शंकर कुटे, अर्जुन कुटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Complaint that the road work is in poor condition