माेबाईलवर व्यस्त असते म्हणून पत्नीविरूद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:26 PM2020-10-31T12:26:17+5:302020-10-31T12:26:32+5:30

Washim Crime News छाेटया छाेटया गाेष्टीवरुन वाद निर्माण हाेऊन ते पाेलीसांपर्यंत जात आहेत.

Complaint against wife as She is busy on mobile | माेबाईलवर व्यस्त असते म्हणून पत्नीविरूद्ध तक्रार

माेबाईलवर व्यस्त असते म्हणून पत्नीविरूद्ध तक्रार

Next

वाशिम : काेराेनामुळे अनेकजण कामाशिवाय घराबाहेर काेणी निघत नसल्याने घरगुती कलही माेठया प्रामणात वाढला असला तरी यामध्ये किरकाेळ कारणच माेठया प्रमाणात जास्त असल्याचे दिसून येत आहे.
घरातील प्रत्येक व्यक्तिचा घरातील व्यक्तिंशी संपर्क वाढला आहे. यामुळे छाेटया छाेटया गाेष्टीवरुन वाद निर्माण हाेऊन ते पाेलीसांपर्यंत जात आहेत. यामध्ये माेबाईलवर जास्त बाेलते, माेबाईल पाहणे, चारित्रयावर संशय यासह अनेक किरकाेळ कारणे दिसून येत आहेत.

तक्रारींची कारणे काेणती?

  • वारंवार माहेरी जाण्याच्या कारणावरुन तक्रारीत माेठया प्रमाणात वाढ आहे. माहेरी जावू देत नाहीत यावरुन चक्क पाेलीस स्टेशन गाठल्या जात आहे
  • माेबाईलवर चॅटींग केल्यामुळे घरातील व्यक्तिंवर दुर्लक्ष करणे. यासह माेबाईलवरुन किरकाेळ तक्रारी
  • चारित्र्यावर संशय
  • घरातील व्यक्तिंचे कामे करीत नसल्याच्या तक्रारी
  •  

काेराेना काळामध्ये महीलांच्या तक्रारीत वाढ झाली असे म्हणता येणार नाही. सरासरी दाखल झालेल्या तक्रारीचे प्रमाण सारखेच आहेत. यामध्ये मात्र माेबाईल पाहण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
- माेनालीया माेरे,
पाेलीस उपनिरिक्षक, महिला सुरक्षा कक्ष 


काेराेनामुळे सर्वच घरी असल्याने संपर्क वाढला!
काेराेनामुळे सर्वच जण जवळपास कामाशिवाय बाहेर निघत नाहीत. त्यात सर्वांशी संपर्क येताे. यामुळे छाेटया छाेटया गाेष्टींवरुन घरात वाद हाेतातच. हिंदीत एक म्हण आहे. ’खाली दिमाग शैतान का घर’ त्याप्रमाणे काहीच काम नसताना एकमेकावर चिडणे, मनालायक काम न झाल्यास ओरडणे व सर्वांशी संपर्क वाढल्याने ही मानसिकता आहे.
- डाॅ. नरेशकुमार इंगळे
मानसाेपचार तज्ज्ञ, वाशिम

Web Title: Complaint against wife as She is busy on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.