बाजार समिती गाळे प्रकरणी कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:39+5:302021-09-18T04:44:39+5:30

बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांनी बुधवार १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ...

Collector orders action in market committee case | बाजार समिती गाळे प्रकरणी कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बाजार समिती गाळे प्रकरणी कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बाजार समितीचे सचिव विजय देशमुख यांनी बुधवार १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीतील कथित घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रातून केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत सचिवांनी संचालकाच्या कथित गैरव्यवहाराची विस्तृत माहिती दिली आहे. रिसोड बाजार समितीवर प्रशासक असतानाही माजी सभापती व काही संचालकांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील असलेले सहायक निबंधक कार्यालयच चक्क विकले. या घटनेमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने संबंधित पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचे अधोरेखित झाले आहे. या गैरप्रकाराची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित माजी सभापती व संचालकांवर भारतीय दंड अधिनियम १८६० नुसार विविध प्रकारचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश २० ऑगस्ट रोजीच दिले होते. त्या अनुषंगाने सचिव विजय देशमुख यांनी पोलीस स्टेशनला तीन वेळा तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती.( प्रतिनिधी)

170921\screenshot_2021-09-17-17-46-53-52.png

जिल्हाधिकार्यांनी पोलीस अधिक्षकांना दिलेले पत्र

Web Title: Collector orders action in market committee case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.