संमतीविनाच उभारला मातीबांध
By Admin | Updated: August 5, 2014 23:25 IST2014-08-05T23:25:41+5:302014-08-05T23:25:41+5:30
कृषी कार्यालयाचा प्रताप

संमतीविनाच उभारला मातीबांध
तळप बु. : मानोरा महसूल विभागातंर्गत येणार्या ग्राम डोंगरगाव क्षेत्रातील गट क्रमांक २७ मधील शेतजमिनीवर मानोरा तालुका कृषि कार्यालयाने सदर शेतमालकाची संमती न घेता शेतात मातीबांध उभारल्याची तक्रार शेतकर्यांनी केली. मानोरा पं.स. अंतर्गत आदर्श गाव सोमठाणा येथील रहिवाशी रामराव राऊत, पंजाबराव राऊत, ज्ञानेश्वर राऊत यांची शेती डोंगरगाव शिवारात आहे. गट क्रमांक २७ मध्ये मानोरा तालुका कृषि कार्यालयाने कोणतीही संमती न घेता मातीबांध उभारल्याची वरील शेतकर्यांची तक्रार आहे. या बाबत सदर शेतकर्यांनी जिल्हा कृषि कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. पण शेतकर्याला न्याय मिळाला नाही. मातीबांधमुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून डोंगरमाथ्यावर जाणारा रस्ता सुद्धा बंद झाला याबाबत राऊत बंधू न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, याबाबत तालुका कृषि अधिकारी एस.के.पडघान यांनी आपण नुकताच पदभार स्वीकारला असून या प्रकरणी चौकशी करू अशी प्रतिक्रिया दिली.