खंडित वीजपुरवठय़ाला ग्राहक वैतागले!
By Admin | Updated: April 23, 2017 09:06 IST2017-04-23T00:51:00+5:302017-04-23T09:06:16+5:30
महावितरणवर धडक; सलग वीजपुरवठय़ाची मागणी.

खंडित वीजपुरवठय़ाला ग्राहक वैतागले!
शेलूबाजार : येथील महावितरण कार्यालयाचा कारभार मागील कित्येक महिण्यांपासून ढेपाळला असून, वारंवार खंडीत होणार्या वीजपुरवठ्यामुळे विजग्राहक कमालीचे वैतागले आहेत. मुख्यालयी न राहणार्यांविरूद्ध कारवाई करावी तसेच सलग वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांच्यासह नागरिक महावितरणच्या मंगरूळपीर येथील कार्यालयावर शनिवारी धडकले.
सद्या उन्हाळ्याचे दिवस असुन ५ ते ६ तासांपयर्ंत तर कधी कधी रात्रभर विज पुरवठा खंडित होतो. खंडित वीजपुरवठा पुर्ववत करण्याकरिता एकही कर्मचारी वेळेवर येत नाही. शेलूबाजार येथे अनियमीत विज पुरवठ्यामुळे विज ग्राहक कमालीचे वैतागले असून, असुन अभियंता व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचा पाढा लांभाडे यांच्यासह नागरिकांनी वरिष्ठांच्या दरबारात वाचला. विज पुरवठा खंडीत झाला किंवा विजेसंदर्भात काही तक्रारी असल्यास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कनिष्ठ अभियंता कॉल रिसीव्ह करित नाहीत, अशी तक्रार निवेदनकर्त्यांनी केली. कृषीपंपानासुध्दा नियमीत विज पुरवठा मिळत नसल्याने शेतकर््यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताचे दरम्यान पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे, सुरज हांडे यांचेसह २५ ते ३0 युवक महावितरण कार्यालयावर गेले असता कार्यालय कुलूप बंद आढळून आले. उशिराने कर्तव्यावर येणार्या अभियंत्यांसह कर्मचार्यांना घेराव घालून विजेसंदर्भातील अडचणी मांडण्यात आल्या. वरिष्ठ अधिकार्यांनी मुख्यालयी न राहणार्यांविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी विलास लांभाडे, सुरज हांडे, संदेश हरणे, हितेश वाडेकर, प्रविण चव्हाण, दिपक हरणे, राजु नबी, मुरली भोसले, नितीन ठाकरे, संदीप हुले, सतिष भोसले यांच्यासह नागरिकांनी शनिवारी केली.