काटेपूर्णा अभयारण्यात अडकलेल्या रस्ता कामाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:37+5:302021-09-11T04:42:37+5:30
रस्ता नुतनीकरण कामाला सुरुवात शेलूबाजार: अकोला-आर्णी राष्ट्रीय मार्गावरील काटेपूर्णा अभयारण्यात अडकलेल्या रस्ता कामाचा तिढा सुटला असून, या रस्त्याच्या कामाला ...

काटेपूर्णा अभयारण्यात अडकलेल्या रस्ता कामाचा मार्ग मोकळा
रस्ता नुतनीकरण कामाला सुरुवात
शेलूबाजार: अकोला-आर्णी राष्ट्रीय मार्गावरील काटेपूर्णा अभयारण्यात अडकलेल्या रस्ता कामाचा तिढा सुटला असून, या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी खड्डे दुरुस्तीची कामे चालू करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत अकोला-आर्णी राष्ट्रीय मार्गाची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. काटेपूर्णा अभयारण्यात फेटरा फाटा ते तांदळीदरम्यानचे अंतर हे अभयारण्यात येत असल्याने हे काम थांबले होते. आता संबंधित खात्याकडून हिरवा कंदील मिळाल्याने रखडलेल्या रस्ता कामाचा तिढा सुटला आहे. यादरम्यान पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. याच मार्गावरील अशीच अडचण वाघा ते महान अंतरदरम्यान आली आहे. त्या अंतराचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे समजले.
100921\img_20210909_154705.jpg
रखडलेल्या रस्ता कामाला झालेली सुरुवात