स्वच्छता, पौष्टीक आहारासंबंधी जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 18:16 IST2019-09-20T18:16:41+5:302019-09-20T18:16:59+5:30
जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते शुक्रवारी हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

स्वच्छता, पौष्टीक आहारासंबंधी जनजागृती!
लोकमत न्यू नेटवर्क
वाशिम : बालकांचे पहिले १०० दिवस अॅनेमिया, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता, पौष्टिक आहार आदींविषयी जनजागृती करण्यासाठी १ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात ‘पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते शुक्रवारी हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह उप मुख्यकार्यकारी अधिकारी (बालकल्याण) नितीन मोहुर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कालिदास तापी, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अंबादास मानकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक सुरज गोहाड, उपशिक्षणाधिकारी श्री. डाबेराव, बालविकास प्रकल्प अभियानचे मदन नायक, पोषण अभियान प्रबंधक आंचल, जिल्हा समन्वयक वाजीद बेग यांच्यासह जिल्हा परिषदेचे कर्मचारी, पर्यवेक्षिका यांची उपस्थिती होती. प्रचाररथाद्वारे पोषण आहार, स्वच्छता, बालकांचे लसीकरण, पोषण घटकांची कमतरता व त्यामुळे होणारे दुष्परिणाम आदी विषयी जनजागृती जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. तसेच गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके यांच्या आरोग्याविषयी सुध्दा जनजागृती करण्यात येत आहे.